चिंचवडमधील कचरा न उचलल्यास, शिवसेना स्टाईलने आंदोलन करु – संतोष साैंदणकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/5555555-696x418.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंचवडमधील प्रभाग क्र. 18 परिसरातील रस्टन कॉलनी, पवनानगर यासह अन्य भागात झाडाचा पालापाचोळा गोळा करुन ठिकठिकाणी ढीग करुन ठेवले जातात. मात्र, कचरा वाहतूक करणारी वाहने उपलब्ध होत नसल्याने, दुर्गंधी पसरून डासांची पैदास होत आहे. त्यामुळे कचरा न उचलल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्या म्हटले आहे की, रस्टन कॉलनी, पवननागर या भागात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. सफाई कर्मचाऱ्यांकडून या भागात साचणारा पाला-पाचोळा व इतर कचऱ्याचा ढीग रस्त्याच्या कडेला साठवून ठेवला जातो. या कर्मचाऱ्यांकडून चांगले काम होत असताना कचरा उचलण्यासाठी कचरागाड्या मात्र येत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत.याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे आहे. त्याकरिता तत्काळ उपाययोजना राबविण्याची मागणी या निवेदनात सौंदणकर यांनी केली आहे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.