breaking-newsपिंपरी / चिंचवड
चिंचवडमधील आठ बांधकामावर हातोडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/9-2.jpg)
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार, शनिवारी चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील नवीन आरसीसी बांधकामावर कारवाई करण्यात आली.
चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 17 येथील आठ बांधकामे पाडण्यात आली. आरसीसी नवीन बांधकामामध्ये 9,512 चौरसफूट बांधकामावर कारवाई झाली. ही कारवाई कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांनी ही कारवाई केली.
कारवाई करण्यासाठी दोन जेसीबी, एक पोकलेन, दहा मजूर, एक ट्रक व मनपा पोलीस यांची मदत घेण्यात आली होती. तसेच या करावाईवेळी चिंचवड पोलीस स्थानकातील 30 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.