breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

चिंचवडच्या बिर्ला रुग्णालयाच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल

पिंपरी –  रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ न देणाऱ्या बिर्ला रुग्णालयाच्या दोघा अधिकाऱ्यांसह जाब विचारणाऱ्यास गेलेल्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या बाऊन्सरवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रशांत मधुकर गायकवाड (वय २९, रा. ठाणे मुंबई) ह्या स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने फिर्याद दिली.  त्यानुसार एक प्रशासकीय अधिकारी व पीआरओ त्यांच्यासह बाऊन्सरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधी वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ सागर राणे ह्या दहा महिन्याच्या मुलाला १५ आॅगस्ट रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पालकांनी उपचारांच्या बिलाचे कोटेशन देऊन रुग्ण आयपीएफ (धर्मदायी रुग्णालय) योजनेत बसवावे, अशी विंनती करूनही त्यांनी योजनेचा लाभ मिळू नये म्हणून तब्बल सात दिवसांनी कोटेशन दिले. या गलथान कारभाराने त्या बालकाला त्याचा लाभ मिळाला नाही तर दोन दिवसांनी ते बालकही मयत झाले. विचारणा करण्यास गेलेल्या स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत गायकवाड व त्यांचे सहकारी विक्रम कदम यांना कुठलीही माहिती न देता उद्धट वर्तन केले तर येथील बाऊन्सरने धक्काबुक्की देत शिवीगाळ केली म्हणन या तिघांविरोधात फिर्याद देण्यात आली आहे. या रुग्णालयाच्या विरोधात पोलिसांत जाण्याच्या तीन दिवसांत दोन घटना घडल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button