breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवडच्या अघोषित बंदला हिंसक वळण

पिंपरी –  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगाव येथे फक्‍त श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. मात्र सोशल मिडियावरून पिंपरी चिंचवड बंद असल्याचे मेसेज फिरत होते. चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात एका टोळक्‍याने दहा ते बारा दुकानांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. तर फुगेवाडी परिसरात बसवर दगडफेक करण्यात आली. यामुळे अघोषित बंदला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले.

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात श्रद्धांजली आणि निषेध सभा सुरू होती. तर दुसरीकडे चिंचवडच्या वाल्हेकरवाडी आणि गुरुद्वारा परिसरात एका टोळक्‍याने दहशत निर्माण करण्यासाठी दहा ते बारा दुकानांवर दगडफेक केली. त्यामध्ये एचडीएफसी बॅंकेच्या एमटीएम आणि नेहा मोटर्स कंपनीच्या शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हेच टोळके चिंचवडच्या विविध भागांमध्ये फिरून बंदसाठी व्यापाऱ्यांना दमदाटी करीत होते.  तर दुसरीकडे फुगेवाडी परिसरामध्ये पीएमपीएमएलच्या (एमएच-12-एफसी-3343) या बसवरही दगडफेक करण्यात आली. मात्र सुदैवाने यात कोणीही प्रवासी जखमी झालेला नाही.

दरम्यान, चिंचवड परिसरात श्रद्धांजली आणि निषेध सभा घेण्यात येणार होती. तर दुसरीकडे सोशल मिडियावर पिंपरी चिंचवड बंदचे आवाहन करणारे मेसेज फिरत होते. या मेसेजची दखल पोलिसांनी घेतली नाही. रविवार असल्याने अनेक वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर होते. मात्र हिंसक घटना घडू लागल्याने त्यांची पुन्हा ड्यूटीवर येण्यासाठी पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button