breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चाकणमधील पोलीस ठाण्यात विष प्राशन करणाऱ्या ‘त्या’ मुलीचा फौजदारावर आरोप?

पिंपरी । प्रतिनिधी

तोंडावर मास्क न लावल्याने एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणीने विष पिण्याचा प्रयत्न केला. चाकण पोलीस ठाण्यात रविवारी (२० सप्टेंबर) दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. अन्य एका प्रकरणात पोलिसांकडून त्रास दिला जात असल्यामुळे तरुणीने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

किरण पडवळ (वय २७, रा. चाकण) असे विष पिण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी याबाबत माहिती दिली.

 चाकण शहरातील महात्मा फुले चौकात चाकण पोलीस हे सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून मास्क न लावता जात होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अडवून आणि त्याच्यावर कारवाई केली.

पोलीस संबंधित तरुणावर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाई करत होते. त्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान त्या तरुणाने फोन केला. फोन केल्यानंतर तरुणी चाकण पोलीस ठाण्यात आली. तिने तिच्यासोबत आणलेले विष पिण्याच्या प्रयत्न केला. तिची प्रकृती आता उत्तम आहे. दरम्यान, या प्रकरण वेगळेच असल्याचे सांगण्यात येत आहे. मास्क न वापरल्यामुळे कारवाई केली हे फक्त निमित्त आहे.

चाकण पोलीस ठाण्यातील एका फौजदाराने तरुणीकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील काही हजार रुपये दिले असून, उर्वरित पैशांसाठी पोलिसांकडून मला आणि माझ्या नातेवाईकांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप तरुणीने केला आहे. तसेच पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आपण पोलीस ठाण्यात विष पिण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले असून, वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button