घोलप महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा
पिंपरी | प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आलं. त्या निमित्त गणित व संख्या शास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यासाठी व्याख्यान व पोस्टर सादरीकरणाचे नियोजन करण्यात आले.
महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी गणित विषयाचे महत्त्व विशद केले. तसेच सर्वांना राष्ट्रीय गणित दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वरवंड महाविद्यालयाचे गणित विभागप्रमुख डॉ. दिलीप घुले यांनी ‘रामार्जुन’ यांचे गणितातील योगदान व त्यांनी गणितातील उलगडलेली कोडी विस्ताराने विद्यार्थ्यांना सांगितली. विभागप्रमुख प्रा.विजय घारे यांनी उपस्थितांचे विभागाच्या वतीने स्वागत केले. गणित विभागातील प्रा. सोनाली बाविस्कर संख्या शास्त्र विभागातील प्रा.अनुपमा कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
एकूण 11 विद्यार्थ्यानी प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण करून काही गणितातील विषय मांडले. काही विद्यार्थ्यांनी ‘कोविड’ चे सामाजिक जाणिवेतुन उद्बोधन केले. यावेळी विभागातल्या एकूण 80 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. रूपा शर्मा या विद्यर्थीनीने सुत्रसंचलन केले.




