Breaking-newsपिंपरी / चिंचवड
घोरावडेश्वर डोंगरावर वटपौर्णिेमेनिमित्त वृक्षारोपण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/IMG-20180628-WA0705.jpg)
पिंपरी – निगडीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग व निसर्ग मित्र विभागाच्या वतीने देहूरोडजवळील घोरावडेश्वर डोंगरावर वटपौर्णिमा वडाच्या पूजेबरोबर वृक्षारोपण करून साजरी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या वतीने वडाचे सामुदायिक पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. दरवर्षी या डोंगरावर महिला वडाची झाडे लावतात. स्वतः लावलेल्या वडाची पूजा या महिलांकडून केली जाते. या वर्षी देखील वडाच्या झाडाची लागवड घोरावडेश्वर डोंगरावर करण्यात आली.
यावेळी डॉ. सुनिता व सुजाता डॉ. हुईलगोळकर, प्रा. निता मोहीते, वैशाली जोशी, मुक्ता चैतन्य, सुखदा भोंसुले, नीता पाटील, विनीता पाचारणे, सुमती कुलकर्णी, उल्का अत्रे, राजश्री व्यास यांच्यासह सुमारे २५ पेक्षा जास्त महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच, अनुजा वनपाळ, माधुरी मापारी, विनिता श्रीखंडे, मानसी म्हस्के यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शारदा रिकामे यांनी पौरोहित्य केले.