‘घराबाहेर न पडता कुदळवाडीकरांनी फोनवरून संपर्क साधून समस्या मांडाव्यात’ – दिनेश यादव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/83444993_1292049844327814_5063195507686375424_o.jpg)
पिंपरी|
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमिवर आमदार महेश लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी कुदळवाडीतील नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका अशी, विनंती केली आहे. तसेच काहीही अडचण आल्यास त्यांना फोन करण्याचंही यादव यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. त्यासाठी दिनेश यादव यांनी त्यांचा फोन नंबर (9175483030) दिला आहे. काही समस्या आल्यास वर दिलेल्या नंबरवर फोन करण्याचे तसेच sms किंवा whats app वर ती समस्या सांगावी.त्यानंतर ती समस्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल, असा विश्वासही यादव यांनी नागरिकांना दिला आहे.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे, हजारे गँसवाले या गृहस्थांनी फोंन करून कुदळवाडी यादवनगर समोरच्या रस्त्यावर कचरा साठल्याची तक्रार दिनेश यादव यांच्याजवळ केली होती. त्यानंतर यादव यांनी संबंधित विभागाला लगेच त्या भागाची सफाई करण्यास सांगितले. त्या प्रमाणे त्या भागाची संपूर्ण सफाई देखील करण्यात आली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/WhatsApp-Image-2020-07-06-at-6.05.01-PM-1024x576.jpeg)
तर, अशा प्रकारे कोणत्याही समस्या नागरिकांना आल्यास त्यांनी घराबाहेर न पडता घरी राहूनच सांगाव्यात. त्या लवकरात लवकर सोडवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल , असा विश्वास दिनेश यादव व्यक्त केला आहे.