breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरफोडीच्या घटनांमध्ये चार लाखांचे दागिने लंपास

  • निगडी, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

पिंपरी – शहरात विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीत दागिन्यांसह तब्बल 4 लाख 10 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहत.

 

चिंचवडच्या पूर्णानगर येथील भगवती मार्केट या किराणा दुकानाचे शटर व ग्रील उचकटून 65 हजार 200 रुपये किंमतीचे तांदुळ व सिगारेटची पाकिटे तसेच 40 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पसार केली. तसेच, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून ही चारी केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 24) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी दुकानाचे मालक भेराराम डुंगाजी चौधरी (वय 54, शिवयोग अपार्टमेंट, शिवतेजनगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

रक्षाबंधनानिमित्त घरातील नागरिक नातेवाईकाकडे गेले असता चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे लोखंडी सेफ्टी दरवाजाचा कोयंडा व लाकडी दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरातील 1 लाख 42 हजार 400 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनी लांबविले. तर, 270 ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिनेही पसार केले. हा प्रकार पिंपळे गुरव येथील टेन इलाइट सोसायटी, पिंपळे गुरव येथे रविवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी घरमालक प्रेमनाथ विठ्ठल राठोड (वय 40, श्रीनगर गल्ली क्रं. 1, टेन इलाईट सोसायटी समोर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

तर, याच ठिकाणी घडलेल्या दुस-या घटनेत तब्बल 1 लाख 63 हजार रुपयांचे सोन्याचे व 500 ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. तसेच, पंधरा हजार रुपयांचे गणपतीचे चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अभिराज राजेंद्र वाघ (वय 30, रा. विनायक हाईट्स, श्रीनगर गल्ली नं. 1, टेन इलाइटसमोर पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button