घरकुल योजनेच्या दिरंगाई बाबत लढा देणार – सूरज गायकवाड
![Home About Yojnechaya Derangai Dinar - Suraj Gaikwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/sarvhara.jpg)
– सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा
पिंपरी | प्रतिनिधी
रमाई आवास घरकुल योजना राबविण्यामध्ये दिरंगाई करणे, अनुदान असताना ते वाटप करताना टाळाटाळ करणे हा बहुजन समाजातील आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांचा अपमान आहे. याच्या निषेधार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज संघटना बेमुदत उपोषण व आंदोलन करत आहे. या आंदोलनाला बहुजन समाज पार्टीने पाठिंबा दर्शविला. तसेच या मागण्यांसाठी पक्षातर्फे लढा देण्याचे आश्वासन दिले. शहराध्यक्ष सुरज गायकवाड यांनी ही माहिती दिली.
झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात आंदोलनात्मक भूमिका बसपाने घेतलेली आहे. या वेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष हुलगेश चलवादी, पुणे जिल्हा प्रभारी रमेश गायकवाड, सागर जगताप, पुणे जिल्हा महासचिव प्रकाश गायकवाड, पुणे जिल्हा सचिव मधुकर इंगळे, पुणे जिल्हा कार्यालय सचिव प्रवीण थोरात, महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या जाधव, पिंपरी चिंचवड शहर बीव्हीफ संयोजक बन्सी रोकडे, पिंपरी चिंचवड शहर सचिव राजेंद्र पवार, पिंपरी विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, सचिन कांबळे, सुनील शिखरे, रत्नदीप जावळे, प्रकाश कांबळे, चोपडे साहेब तसेच इतर बसपाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.