गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेचे निर्मला कुटे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपळे सौदागर येथील आण्णासाहेब मगर विद्यालयात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासना मार्फ़त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) अंतर्गत गोवर व रुबेला या धोकादायक रोगावरील लसीकरण मोहिम राबवण्यात आली. या मोहीमचे उद्घाटन नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते लहान मुलांना लासीकरणाचे प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.संगिता तीरुमनी (जिजामाता रुग्णालय), डाॅ.शिवाजी ढगे वैद्यकीय अधिकारी, पद्मा राजेंद्र जगताप सिनीयर सिस्टर, शोभा ढोले, ज्योति शिंदे शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका निर्मला कुटे व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी गोवर व रुबेलावर मात करून जबाबदार पालक व्हा व आपल्या ९ महिने ते १५ वर्षाच्या आतील बालकांना हे लसीकरण करुन घेण्याचा संदेश नागरिकांना दिला.