गांजा विक्री करणा-या भाटनगरमधील तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/209573-ganja.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – बेकायदेशीरपणे गांजा पुरवठा करणा-या भाटनगरमधील एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडे 3 लाख 27 हजार रुपयांचा 21 किलो गांजा मिळून आला. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी शनिवारी (दि. 29) रात्री आठच्या सुमारास पिंपरी डेअरी फार्मच्या रस्त्यावर करण्यात आली.
रोहित सुनिल मढले (वय 25, रा. बिल्डींग नं. 3, तिसरा मजला, भाटनगर, गणेश मंदिराजवळ, लिंक रोड, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शनिवारी रात्री गांजा घेऊन पिंपरीतून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रात्री आठच्या सुमारास त्याला डेअरी फार्म रस्त्यावर अडवले. त्याची चौकशी केली. त्याच्याजवळ 21.833 किलो गांजा मिळून आला. त्याची काळ्या बाजारातील आजरोजीची किंमत 3 लाख 27 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी नोंद केले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.