breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

कोविड 19चे उच्चाटन करण्यासाठी महापालिकेत उच्च अधिका-यांचे पथक

  • प्राधिकरण, पीएमआरडीए अशा शासकीय आस्थापनेतील अधिकारी नियुक्त
  • पालिकेच्या प्रभागनिहाय कोरोनाचा -हास करण्याचे कामकाज होणार सुरू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शहरात कोरोनाने हाहाकार केलेला असताना याला प्रतिबंध घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून अधिकच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मदतीला तीन उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार एक सहायक संचालक आणि दोन सहायक निबंधकांचे पथक देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. काही दिवसांतच समुह संक्रमणाचे संकेत मिळत आहेत. तत्पुर्वीच युध्द पातळीवर उपाययोजना करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निर्णय घेतला आहे. पालिका कार्यक्षेत्रातील शासकीय व खासगी रुग्णालयाच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. आता पालिकेच्या प्रभागनिहाय उपाययोजना केल्या जाणार आहे. त्यासाठी आयुक्तांच्या मदतीला तीन उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार, एक सहाय्यक संचालक आणि दोन सहाय्यक निबंधकांची नेमणूक केली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नियंत्रणाखाली त्यांचे कामकाज चालणार आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांच्याकडे महापालिकेच्या ‘ड’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी करमकर यांच्याकडे ‘अ’ व ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज सोपविले आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडी)च्या तहसीलदार गीता दळवी यांच्याकडे ‘ह’ व ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकार दिले आहेत. सहकारी संस्थेतील सहाय्यक निबंधक प्रवीण निनावे यांच्याकडे ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय आणि सहाय्यक निबंधक बी. आर. माळी यांच्याकडे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी दिली आहे. तर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे तहसीलदार सुनील बेल्हेकर यांच्याकडे पालिकेच्या कोविड 19 वॉर रुमचे कामकाज देण्यात आले आहे. बेल्हेकर यांनी अतिरिक्त आयुक्त पाटील यांच्या सूचनेप्रमाणे कामकाज करायचे आहे.

पालिकेच्या सर्व रुग्णालयातील स्वॅब टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोविड केअर सेंटर (सीसीसी) इत्यादी कामकाजामध्ये रुग्णालय प्रमुख व क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून काम करण्याची जबाबदारी त्यांच्याद्वारे पार पाडली जाणार आहे. कामकाजाचा दैनंदिन अहवाल अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना सादर केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button