breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोविड सेंटरसाठी दिघीतील तालेरा कंपनीची जागा अधिग्रहित करा

  • मनसे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील सध्याची परिस्थिती पाहता सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना पेशंट वाढत आहेत. त्यांच्यासाठी आपले महानगरपालिकेच्या हॉस्पिटल आणि कोविड सेंटर आहेत. परंतु, ते अपुरे पडत आहेत. तरी पुणे आळंदी रोडवरील दिघी येथील तालेरा कंपनीचे गोडाऊन मोकळे आहे. ते ताब्यात घेऊन तेथे कोविंड सेंंटर उभारावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी केली आहे.

अंकुश तापकीर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. ‌त्यात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना पेशंट वाढत आहेत.  महानगरपालिकेच्या हॉस्पिटल व कोविड सेंटर अपुरे पडत आहेत. त्ययातच  दिवसेंदिवस सध्या कोरोना पेशंटची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. च-होली दिघी, डुडुळगाव, मोशी, आणि भोसरीचा काही भागातील कोरोना पेशंटसाठी पुणे आळंदी रोड दिघी हद्दितील तालेरा नामांकित कंपनीचे मोठे गोडाऊन आहे. ते मोकळे असून रेडीमेडड शेड स्वरूपात आहे. त्या‌ठिकाणी साधारण ७०० ते ८०० बेडची व्यवस्था होईल,  अशा स्वरूपाचे भव्य गोडाऊन आहे.  त्या ठिकाणी ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला  मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी पाठवले आहेत. तरी येथे या भागातील नागरिकांसाठी व कोरोनि पेशंटसाठी कोविड सेंटर उभारण्यात यावे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरी पाऊस झाला तरी पेशंटची निगा राखणे सोपे जाईल.

पुणे-आळंदी रोडला लागून असल्याने त्या ठिकाणी सर्व गोष्टींची निगा राखणं महानगरपालिकेला सोपे जाईल. या अनुषंगाने आपण तातडीने आमच्या मागणीचा विचार करावा आणि लवकरात लवकर त्याठिकाणी मोठे कोविड सेंटर उभारून कोरोना पेशंटला त्याठिकाणी उपचार मिळावेत, याकरता व्यवस्था करावी.  या भागातील पेशंटला ज्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर त्याला ज्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी पाठवण्यात येते. पण, त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने उपचार मिळत नाही. तरी जागेचा गांभीर्यपूर्वक तातडीने विचार करावा, असे अंकुश तापकीर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button