कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर आझम कॅम्पसची शिवजयंती अभिवादन मिरवणूक रद्द
![Kovid Sathyachaya playback landowner Aazham Kampasachi Shivjayanthi greetings Miravanuk canceled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Shivaji-Maharaj.jpg)
पुणे । प्रतिनिधी
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस )च्या वतीने दरवर्षी होणारी शिवजयंती अभिवादन मिरवणूक यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव डॉ. लतिफ मगदूम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले कि, अभिवादन मिरवणूक रद्द करण्यात आली असली तरी संस्थेचे पदाधिकारी १९ फेबुवारी रोजी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणार आहेत. गेली १६ वर्षे ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस ) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रेषित महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. संस्थेच्या सर्व शैक्षणिक आस्थापनातील १० हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी होतात आणि महामानवाचे मानवतेचे संदेशांचा प्रसार करतात.