breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना संसर्ग, पिंपरी-चिंचवडमध्ये जागोजागी फेकले जाताहेत वापरलेले मास्क

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण आढळले असून शहरवासियांमध्ये काळजीचे वातावरण आहे. “करोना’च्या भीतीने नागरिकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. परंतु स्वतःला आजारापासून वाचविण्यासाठी मास्क वापरणारे इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता वापरलेले मास्क रस्त्यावर फेकत असल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहे. वापरुन फेकलेल्या मास्कमुळे इतर आजारांचे संक्रमण होण्याचा धोका आहे, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जागोजागी महापालिकेच्या वतीने मास्क संकलन करण्यासाठी संकलन केंद्र उभारावे, अशी मागणी नागरीक करत आहेत.

पुण्यापेक्षा जास्त प्रमाणात पिंपरी-चिंचवड शहरात अधिक रुग्ण आढळल्याने शहरवासियांनी मोठया प्रमाणात मास्कचा वापर करण्यात येत आहे. मात्र शहरातील काही ठिकाणी हे मास्क वापरुन नागरिकांनी फेकून दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यातून इतर आजारांचे संक्रमण होण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील वापरलेले मास्कची योग्य विल्हेवाट लावावी व सर्दी, खोकला व ताप असल्यास योग्य काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. परंतु या अशा पध्दतीने मास्क फेकले जात असतील तर महापालिकेच्या वतीने योग्य पाउल उचलण्यात यावेत, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. नागरिकांनी देखील ही आणीबाणीची परिस्थिती ओऴखून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

वापरलेले मास्क नागरिकांनी रस्त्यावर फेकता कामा नये. यामुळे रस्त्यावर घाणही होते. नागरिकांनी या परिस्थितीत एक पाउल पुढे येऊन मास्कची योग्य विल्हेवाट लावावी, तसेच रोजचा कचऱ्याची देखील योग्य विल्हेवाट लावावी. महापालिकेच्या कर्मचारी रोज सफाई करतात परंतू सफाई केल्यानंतर देखील काही ठिकाणी कचरा टाकला जातो. या सर्व गोष्टी नागरिकांनी टाळल्या पाहिजेत.
– डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button