breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पगडीबाबत कोणत्याही समुहाला दुखावण्याचा हेतू नव्हता; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा खुलासा

पुणे – पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात फुले पगडी वापरावी अशी ताकीद कार्यकर्त्यांना दिली. या वक्तव्यामुळे देशभरात चर्चेला उधान आले. त्यावर पवार यांनी एका कार्यक्रमात याबाबत खुलासा केला आहे. मी ज्यांना आदर्श मानतो, त्या महात्मा फुलेंची पगडी वापरावी, हाच माझा हेतू होता. कोणत्याही समुहाबाबत हे वक्तव्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल मेळाव्याची पश्चिम महाराष्ट्रातील सांगता 10 जून रोजी पुण्यात झाली. त्यावेळी कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापुढे पक्षाच्या कार्यक्रमात फुले पगडी वापरण्याचे सूचित केले. त्यांच्या या वक्तव्याला जातीय स्वरुप देऊन देशभरात आरोप प्रत्यारोप झाले. पगडी न वापरण्याचा निर्णय खटकल्याने पवार यांच्यावर नाराजी व्यक्त झाली. त्यामुळे पवार यांनी त्याबाबत आज शनिवारी (दि. 16) पुण्यातील एका कार्यक्रमात खुलासा करून गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले आहे. माझ्या वक्तव्याची खूप चर्चा झाली. अनेक मंडळी दुखावली गेली. परंतु, त्या वक्तव्यामागे माझा दुसरा काही हेतू नव्हता. कुणाबाबत वैयक्तिक किंवा कुठल्या समूहाबाबत ते वक्तव्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले की, मध्यंतरी मी पगडीबाबत केलेल्या विधानाची देशभर चर्चा होत आहे. मी येथे वाढलो, शिकलो आहे, त्यामुळे मला पुण्याचा अभिमान आहे. मुलींनी शिक्षण घ्यावे, हा महात्मा फुलेंचा दृष्टिकोन होता. येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये मुलींना 80 वर्षांनी का होईना प्रवेश मिळतो, ही चांगली बाब आहे. याचा अर्थ पुणे बदलतेय, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button