breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केजूदेवी उद्यानाची सीमाभिंत कोसळली; सुदैवाने जिवित हानी नाही

  • सकाळी माॅर्निगवाॅक करणारे नागरिक बचावले, सुदैवाने जीवित हानी नाही

पिंपरी ( महा ई न्यूज ) – राज्यातील अनेक भागात संततधार पडणा-या पाऊसामुळे सीमाभिंत, घरांच्या भिंती कोसळून अनेकांचा बळी गेला आहे. त्यातच थेरगांव येथील केजूदेवी मंदिरालगत असलेल्या महापालिकेच्या उद्यानाची सीमाभिंत शुक्रवारी सकाळी कोसळली आहे. त्यामुळे माॅर्निग वाॅक करणारे नागरिक करणारे थोड्यात बचावले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सीमाभिंतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागाने शहरातील सर्व उद्यानाची सीमाभिंत बांधली होती. थेरगांव येथील पवना नदीशेजारी केजूदेवी मंदिर आहे. त्या मंदिरजवळ महापालिकेने उद्यान तयार केले आहे. त्या उद्यानासाठी संरक्षण सीमाभिंत बांधलेली आहे. मागील दोन वर्षापुर्वीच ही भिंत बांधल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

केजूदेवी मंदिराशेजारी उद्यानाच्या संरक्षण सीमाभिंतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. संबंधित ठेकेदारांने सीमाभिंत बांधताना पायाभरणी व्यवस्थित न केल्याने अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेले होते. काम करताना देखील व्यवस्थित न केल्याने सीमाभिंत कोसळ्याचे नागरिक सांगत आहेत.

दरम्यान, केजूदेवी उद्यानाची सीमाभिंत तब्बल 35 ते 40 फूट अंतरापर्यंत कोसळली आहे. रिमझिम पावसामुळे अशा प्रकारे सीमाभिंत कोसळत असतील तर काम किती निकृष्ट असेल, याचा हा नमुना असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसापुर्वी कासारवाडी येथील सोसायटीची सीमाभिंत कोसळून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल झाला. परंतू, महापालिका चाैकशी समितीने आयुक्तांकडे अहवाल सादर केला. तरीही ठेकेदार आणि सोसायटीच्या चेअरमनवर अद्याप कारवाई केलेली नाही. याकडे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दुर्लक्ष केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button