कासारवाडीतील विसर्जन घाटाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण
पिंपरी – महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील कासारवाडी येथील ह प्रभाग कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या गणपती विसर्जन घाटाचे महापौर राहुल जाधव यांच्या लोकार्पण झाले.
यापूर्वी कासारवाडी मधील गणपती विसर्जन हे स्माशानभूमी येथून होत होते. त्यामुळे नागरीकांची गणपती विसर्जनाची मोठया प्रमाणात गैरसोय होत असल्याने या प्रभागातील नगरसदस्या आशा शेंडगे यांच्या प्रयत्नातून गणपती विसर्जन घाट अदयावत करुन नागरीकांनसाठी खुला करण्यात आला.
आज शुक्रवारी (दि. 14) सकाळी झालेल्या या कार्यक्रमास ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या आशा शेंडगे, स्वाती काटे, नगरसदस्य रोहित काटे, राजू बनसोडे, स्वीकृत सदस्य माऊली थोरात, कुणाल लांडगे, संजय कणसे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, कार्यकारी अभियंता संजय घुबे, सामाजिक कार्यकर्ते संजय शेंडगे, मंदा घावटे, शोभा सिंग, चंद्रकांत जाधव, किरण शिंदे, यशवंत गंभिरे, राजू पठारे, लतीफ शेख, मिनल जोशी आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.