Breaking-newsपिंपरी / चिंचवड
काळेवाडीत पावनेपाच लाखांच्या दोगिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/dc-Cover-q2fijvbg8c3cal61s8coh9caa0-20160228013711.Medi_.jpeg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 4 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. ही घटना काळेवाडी येथील विजयनगर याठिकाणी कमलाकर निवास येथे रविवारी (दि. 1) घडली.
याप्रकरणी नितीन नंदलाल गोगीया (वय 43, रा. कमलाकर निवास, समर्थ कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गोगीया हे काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 140 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे एकूण 4 लाख 70 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी काल मंगळवारी (दि. 3) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.