breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कार्यकर्त्यांनो जबाबदारी खांद्यावर घेऊन भाजपच्या विरोधात आवाज उठवा – काँग्रेसच्या प्रिया पवार

  • पिंपरीत पार पडली युवक काँग्रेसची बैठक 
  • प्रिया पवार यांनी जाणून घेतल्या कार्यकर्त्यांच्या सूचना

पिंपरी, (महाईन्यूज) – कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीची जबाबदारी घेऊन रस्त्यावर उतरावे. सत्ताधारी भाजप सरकारच्या चुकीच्या कामाच्या विरोधात आवाज उठवावा. काँग्रेसने केलेल्या कामांची नागरिकांना जाणिव करून द्यावी, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसच्या नवनियुक्त प्रभारी प्रिया पवार यांनी पिंपरीत केले.

पिंपरी-चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसची बैठक आज पिंपरीत पार पडली. बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, एनएसयूआयचे माजी प्रांताध्यक्ष मनोज कांबळे, प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सचिन कोंढरे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, करणसिंग गील, गौरव चौधरी, सिध्दार्थ वानखेडे, नियाज शेख, दिपक भंडारी, फारूख खान, अनिल सोनकांबळे, वसीम शेख, स्नेहल गायकवाड, विशाल कसबे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाल्या की, उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीना अटक झाली. ज्या जमिनीवरुन दहा गोरगरीब आदिवासी बांधवांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्या जमिनीचे प्रकरण उत्तरप्रदेश सरकारच्या एका प्रकल्पाशी निगडित आहे. प्रियांका गांधींना पीडित कुटूंबांपर्यंत पोहचण्यास अडथळे निर्माण केले. एका सरकारी प्रकल्पासाठी बळजबरीने ही जमीन आदिवासी लोकांकडून हडपण्याचा प्रयत्न योगी सरकार करत आहे. जर प्रियंका गांधी हत्यांकाडातील पीडित कुटुंबियांना भेटल्या तर योगी सरकारचा खुनी चेहरा चव्हाट्यावर येईल, या भीतीपोटी प्रियंका गांधीना अटक केली आहे. या जुलमी सरकारला सळो कि पळो करण्यासाठी अधिक आक्रमक व्हा. पक्षाची संपूर्ण जबाबदारी युवकांवर आहे. जनतेच्या मनात असलेल्या अपेक्षांसाठी युवकांनी अतोनात प्रयत्न करणे काळाची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

याप्रसंगी सचिन कोंढरे, मयुर जयस्वाल, नरेंद्र बनसोडे, मनोज कांबळे, अशोक मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार हिराचंद जाधव यांनी मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button