breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामगार, मजुरांच्या हितासाठी देशात आघाडीची सत्ता येऊ दे; पार्थ पवारांचे भैरवनाथाला साकडे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार दौरा आज मामुर्डी गावातून सुरू झाला. प्रथम त्यांनी येथील श्री भैरवनाथाचे मनःपूर्वक दर्शन घेतले. कामगार, मजूर आणि शेतक-यांच्या हितासाठी पुन्हा देशात आघाडीची सत्ता येऊ दे, असे साकडे त्यांनी भैरवनाथाला घातले. त्यानंतर शेतकरी, कामगार, मजूर वर्गाच्या भेटीगाठी घेत पार्थ पवार यांचा ताफा पुढील प्रचारासाठी जोमाने सरसावला.

लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ आल्याने मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा झंजावात सुरू झाला आहे. उमेदवार पार्थ पवार हे पायाला भिंगरी लावून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज चिंचवड विधानसभा मतदार संघातील मामुर्डी, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पिंपळे निलख, वाकड भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार, आयटीयन्स यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

मामुर्डी गावातील भैरवनाथाला उमेदवार पार्थ पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून पवार यांनी मानवंदना दिली. दरम्यान, पार्थ पवार यांनी यावेळी उपस्थित सुमारे 70 तरुणांशी संवाद साधला. “स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमधील दिनदुबळ्यांवर आज महागाईचे संकट कोसळले आहे. महिलांची सुरक्षितता चिंतेचा विषय बनली आहे. तरुणांना बेरोजगारी सहन करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारं सरकार आणण्यासाठी आघाडीला मतदान करा, अशी साद पार्थ पवार यांनी तरुणांना घातली.

यावेळी मंदिराच्या बाहेरील वडाच्या सावलीत बसलेले जवळपास 50 ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले. पेन्शन योजना, आरोग्य योजनेचा लाभ मिळतो की नाही, अशी विचारणा देखील पार्थ पवार यांनी केली. यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांच्या चेह-यावर नाराजी निर्माण झाली होती. या नाराजीमागचे खरे कारण पवार यांच्या लक्षात आले. मात्र, कोणावर टिका न करता त्यांनी सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी ज्येष्ठांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button