कामगार नेते यशंतव भोसले यांच्यावर गुन्हा दाखल; कंपनी व्यवस्थापणाला दमबाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/chakan.jpeg)
यशवंत भोसले यांच्यासह एकजणावर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
चाकण –एमआयडीसीतील कंपनीमध्ये व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमबाजी केल्याप्रकरणी कामगार नेते यशवंत भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मौजे भांबोली, ता. खेड, जि. पुणे या गावच्या हद्दीत प्लास्टीक ओमनीअम कंपनीमध्ये कामगार नेते यशंत भोसले आणि त्यांचा सहकारी गेले होते. दि. १५ नोव्हेबर रोजी हा प्रकार घडला आहे. भोसले आणि त्यांचा सहकारी कंपनीसमोर गेल्यानंतर तेथील सुरक्षारक्षकांना त्यांनी दमबाजी व शिवीगाळ केली. तसेच, जबरदस्तीने कंपनीमध्ये घुसून रिसेप्शनमध्ये कंपनीचे एम. डी. बिरांची मोहपात्रा, प्लँट डायरेक्टर जी. के शर्मा व इतर यांच्यासोबत उद्धटपणे बोलले. तसेच, कंपनीच्या गेटवर गेटसभा घेवून कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला. याबाबत कंपनीतील सिक्युरिटी सुपरव्हायझर अंबादास गळवे (रा. भांबोली, ता. खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
***
राजकीय सुडबुद्धीने गुन्हा दाखल केला असावा – यशवंत भोसले
कंपनीच्या गेटसमोर पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेवूनच सभा घेतली होती. तसेच, कंपनी व्यवस्थान आणि कामगार प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चाही सुरू होती. कामगारांच्या प्रश्नांबाबत आम्ही व्यवस्थापनाशी बोलत आहोत. ही घटना महिन्याभरापूर्वीच घडली आहे. त्यानंतर आता गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमागील नेमका हेतू काय आहे? याचा आम्ही शोध घेत आहोत. राजकीय सुडबुद्धीने हा गुन्हा दाखल केला असावा, अशी प्रतिक्रीया कामगार नेते यशवंत भोसले यांनी ‘महाईन्यूज’ शी बोलताना दिली.