breaking-newsपिंपरी / चिंचवड

कस्पटे वस्तीत चेंबर ‘ओव्हर फ्लो’, दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य संकटात

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 वाकड येथे रस्त्यावरील चेंबर चॉक अप झाल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. येथील नागरिकांना तसेच वाहनचालकांना दुर्गंधीचा त्रास सहन कारावा लागत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

वाकड येथील कस्पटे वस्ती येथील मरुधर मेडिकल समोरील रस्त्यावरचा चेंबर गेली दोन दिवस ओसंडून वाहत आहे. स्थानिक प्रभाग अधिकारी अथवा आरोग्य कर्मचा-यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे हे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची तक्रार करूनही प्रशासन वेळीच कार्यवाही करत नसल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

गेली दोन दिवसांपासून कस्पटे वस्ती येथील घाण पाण्याचा चेंबर ओसंडून वाहत आहे. क्षेत्रीय अधिकारी अथवा कर्मचा-यांनी याकडे लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, दोन ते तीन दिवस झाले कोणीही याठिकाणी फिरकला नाही. त्यामुळे घाण पाण्याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. यासंदर्भात महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना याबाबत माहिती आणि क्षणचित्रे पाठविली आहेत. त्यांच्याकडून या चेंबरची दुरूस्ती आपेक्षीत आहे.

  • ज्ञानेश्वर कस्पटे, युवा कार्यकर्ते, राष्ट्रवादी
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button