breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कर्तव्यदक्ष कोरोनायोद्धा : पिंपरी-चिंचवडची प्रतिभा जाधव शस्त्रक्रियेनंतर तात्काळ रुग्णसेवेत!
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
शस्त्रक्रियेला अवघा एक महिना झाला असताना कोरोना नावाची महामारी आली. तसेच कुटुंबाला पहिल्यांदाच सांगितले माझ्यासाठी माझे कर्तव्य पहिले. त्यासाठी मला तुमच्यापासून व मुलापासून कदाचित लांब रहावे लागेल. हे क्षेत्र निवडताना “सेवा परमो धर्म” ही शपथ पहिली घेतली होती. त्यामुळे “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा” हेच ब्रीद सांभाळत पिंपरीगाव येथील परिचारिका प्रतिभा प्रथमेश जाधव या कोविड योध्या आपली निरंतर सेवा मुंबई महानगरपालिकेच्या सायन हॉस्पिटल येथे देत आहेत.
कोरोना मुळे कुटुंबापासून लांब राहत असले तरी इकडे माझी राहण्याची सोय नाही. तसेच रुग्णालयातील हॉस्टेलमध्ये जास्त दिवस राहण्याची परवानगी मिळत नाही. तसेच रूम भाड्याने घ्यावी म्हणाल तर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रूम मालक खोली भाड्याने देत नाहीत.