breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तीन लाखांचे कर्ज मिळवून देण्यासाठी महिलेला घातला सव्वा लाखाचा गंडा

वाकड, (महा-ई-न्यूज) –  रहाटणीतील एका महिलेला तीन लाखांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण १ लाख ३४ हजार रुपये भरण्यास सांगून त्यांची आर्थीक फसवणूक केली.  ही घटना ऑक्टोबर २०१८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान घडली.

याप्रकरणी रहाटणीतील २९ वर्षीय फसवणूक झालेल्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात सहा वेगवेगळ्या मोबाईल नंबर धारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात एका प्रसिध्द वृत्त पत्रातामध्ये झटपट कर्ज मिळेल अशा तरेची जाहिरात देण्यात आली होती. ही जाहिरात फसवणूक झालेल्या २९ वर्षीय महिलेने वाचली त्यांना ३ लाख रुपयांची गरज होती. यामुळे महिने जाहिराती मधील संपर्क क्रमांकारवर फोन करुन त्यांना ३ लाखांचे कर्ज हवे असल्याचे कर्ज पुरवणाऱ्या इसमाला सांगितले. यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरुन फोन करुन महिलेकडून एकूण १ लाख ३४ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आरोपींनी भरायला सांगितले. मात्र आरोपींनी फिर्यादी महिलेला कुठल्याही प्रकारचे कर्ज न नेता त्यांची आर्थीक फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात चार विविध मोबाईल क्रमांक धारक, पंकज गुप्ता आणि विजयबेन छावडा नामक इसमांविरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजन तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button