breaking-newsपिंपरी / चिंचवड

करोना विषाणूचा फैलाव लक्षात घेता मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द – सचिन चिखले

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

करोना विषाणूचा फैलाव महाराष्ट्रात होत आहे. पण, करोना व्हायरसचा प्रसार रोखायचा असेल तर, गर्दी टाळून आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

याबाबत माहिती देताना मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून मनसैनिक गुढीपाडवा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करत होते. मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेसाठी बैठका, मेळावे सुरु होते. त्यासाठी लोक एकत्र जमा होतात. करोना हा साथीच्या आजारामध्ये मोडत असल्याने सरकारने खबरदारी उपाय म्हणून काही दिवसांसाठी चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसंच, येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणुका होणार असून, सध्याची परिस्थिती पाहता सरकारनं या निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलाव्यात, अशी मागणीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे, अशी माहिती चिखले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button