Breaking-newsपिंपरी / चिंचवड
करोनाचा प्रतिकार करण्यासाठी युवासेनेतर्फे भोसरी पोलिसांना ‘मास्क’
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
दिवसेंदिवस करोना विषाणुचा संसर्ग पुण्यात वाढत चालला आहे. त्यामुळे त्याची खबरदारी घेणे महत्वाचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी युवासेनेतर्फे 24 तास कर्तव्यदक्ष असलेल्या भोसरी पोलीस स्टेशनमधील पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, आर. डी. तापकीर, तात्या तापकीर, रविंद्र जाधव, मंदा गायकवाड, रेखा थोरात आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके आणि आशिर्वाद महिला बचतगटाच्या शिला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदू काची यांनी केले.