breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचरा न उचलणाऱ्या ठेकेदारासह कामचुकार अधिका-यांवरही कारवाई हवी – महापाैर उषा ढोरे

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

महापालिकेच्या ड क्षेत्रिय परिसरातील विविध अडचणी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी बैठक घेतली. या बै़ठकीत नागरिकांनी आणि नगरसेवकांनी कचरा संकलन आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा पाढा वाचला. त्यावर कचरा न उचलण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, असे निर्देश महापौरांनी प्रशासनास दिले आहेत.

महापालिकेच्या ड क्षेत्रिय कार्यालयांमधील सभागृहात सकाळी अकराला बैठक आयोजित केली होती. या बैठकीस शिवसेना गटनेते राहूल कलाटे, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्य संदिप कस्पटे, सागर आंगोळकर, नगरसदस्या आरती चोंधे, ममता गायकवाड, रेखा दर्शले, प्रभारी प्रभाग अधिकारी सिताराम बहुरे, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, देवण्णा गट्टूवार, प्रमोद ओंबासे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले संबंधित उपअभियंता उपस्थित होते. यावेळी वाकड, पिंपळे निलख भागातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेविका आरती चौंधे यांनी कचऱ्याची समस्या मांडली.

कचरा संकलनाचे काम नियमितपणे आणि सुनियोजितपणे होत नाही, कोण कोणत्या भागातील कचरा उचलते याची माहिती लोकप्रतिनिधींना होणे गरजेचे आहे, असे मत चौंधे यांनी मांडले. त्यानंतर कलाटे यांनी कचऱ्याच्या गाड्या वेळेवर येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. परिसरात कचरा उचलण्याचे काम कोणत्या संस्थेस आहे, त्यांची नावे, संपर्क क्रमांक, आरोग्य अधिकाऱ्यांची नावे डिस्प्ले करायला हवीत, अशी सूचना केली. त्यानंतर महापौरांनी कचरा उचलण्याची जबाबदारी असणाऱ्या संस्थेला खडसावले. काम जर व्यवस्थितपणे केले जात नसेल तर महापालिकेने कारवाई करायला हवी, अशा सूचना केल्या.
त्यानंतर काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी तक्रारी केल्या.

पाणी नियमित आणि वेळेवर पुरसे मिळायला हवेत. नागरिक कर भरतात त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. नागरिकांच्या समस्येकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. त्यावर महापौरांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन मार्ग काढायला हवा, अशी सूचना केली. तसेच या बैठकीत प्रभागातील रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली. त्यावर रस्ते दुरुस्ती, सुरळीत व समप्रमाणात पाणीपुरवठा तसेच आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाºयांना सुचना दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button