breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ऑटो क्लस्टरमध्ये होणार ‘पिंपरी चिंचवडचे स्मार्ट सिटी कार्यालय’

  • दरमहा स्मार्ट सिटी कंपनी देणार साडेचार लाख रुपये भाडे
  • 1400 चाैरस मीटर जागा फर्निचरसह तीन वर्षाचा करारनामा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीची स्थापनेनंतर कार्यालयाची शोधाशोध सुरु होती. मागील दोन वर्षापासून स्मार्ट सिटीचे स्वतंत्र कार्यालय झालेले नाही. अखेर स्मार्ट सिटी कंपनीचे स्वतंत्र कार्यालय जागेचा प्रश्न सुटला असून चिंचवडच्या ऑटो क्लस्टरमध्ये 1400 चाैरस मीटर जागा फर्निचरसह भाड्याने घेण्यात आली आहे. त्यासाठी प्रतिमहा साडेचार लाख रुपये भाडे मोजणार असल्याचे सीईओ तथा आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची आठवी बैठक आज (शुक्रवार) महानगरपालिका आयुक्त कक्षात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, केंद्र शासन प्रतिनिधी ममता बात्रा, महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संचालक प्रमोद कुटे, सचिन चिखले, पोलिस आयुक्त आर.के.पद्यनाभन, पीएमपी व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागीय आयुक्त पी.एस.खांडकेकर, आयुक्त तथा सीईओ श्रावण हर्डिकर, निळकंठ पोमण, राजन पाटील, लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराचा केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याची घोषणा डिसेंबर २०१६ मध्ये झाली. नंतर या प्रकल्पासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करून त्यावर संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले. तसेच. कामकाजासाठी मानद सचिव, लेखापरीक्षक, संगणकतज्ज्ञ, खासगी एजन्सीचे प्रतिनिधी आदींच्या नेमणुका झाल्या आहेत. समावेश झाल्यापासून आतापर्यंत स्मार्ट सिटी कंपनीकडून सुमारे हजार कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या. काही कामे सुरू आहेत. मात्र.  या कंपनीसाठी स्वतंत्र कार्यालय नव्हते.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून स्मार्ट सिटी कार्यालय ऑटो क्लस्टरमध्ये सुरू करण्याचा विचार सुरू होता. त्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. पालिका व पुणे-मुंबई मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर असलेले हे कार्यलाय फायदेशी राहील. ऑटो क्लस्टरमधील दुसरा मजल्यावरील सुमारे 1400 चौरस मीटर जागा वापरता येणार आहे. तसेच, आगामी संचालक मंडळाची बैठक या स्वतंत्र कार्यालयात घेतली जाणार असल्यातेही हर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

तसेच पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी व आॅटो क्लस्टर यांचे जागा ताब्यात घेण्यास सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, ममता बात्रा यांची स्मार्ट सिटी संचालकपदी नियुक्ती तर अ.मा. भालकर यांची स्मार्ट सिटी जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button