breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एलईडीच्या विषयावरून सत्ताधा-यामध्ये सावळा गोंधळ

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे बसविण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पचनी पडलेला नसून, ‘अर्थकारणामुळे’ विषय मंजूर, नामंजूर, फेरप्रस्ताव करण्याचा खेळ सुरू आहे. सावळा गोंधळ सुरू असतानाच बुधवारच्या सर्वसाधारण सभेसमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ऊर्जा संवर्धनासाठी ३८ हजार ७५५ विविध क्षमतेचे एलईडी दिवे रस्त्यांवर बसविले आहेत. तर विविध रस्त्यांवर ३६ हजार दिवे सोडिअम व्हेपर, मेटल हालाईडचे दिवे कायम आहेत. त्याऐवजी एलईडी दिवे बसविण्यासाठीचे काम देण्याचा विषय आहे. संबंधित संस्था पारंपरिक फिटींग काढून एलईडी फिटींग बसविणार आहे. फिटींगची वॉरंटी सात वर्षे आहे. यामध्ये मध्यवर्ती नियंत्रित कक्षातून दिवे नियंत्रित करण्यात येणार आहेत. तसेच देखभाल-दुरुस्तीचे कामही केले जाणार आहे. यासाठी महापालिकेला खर्च येणार नाही.

सद्य:स्थितीतील दिव्यांचा तसेच एलईडी बसविण्यात आल्यानंतर दिव्यांच्या प्रकाश तीव्रतेचा संयुक्तीक पाहणी करून अहवाल तयार के ला जाणार आहे. तसेच दिव्यांची वॉरंटी कालावधी देखभाल-दुरुस्तीसह सात वर्षांचा आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहर सुधारणा समितीच्या २४ जुलैला सभेत हा प्रस्ताव सादर केला. त्या वेळी समितीने हा विषय महिनाभर तहकूब केला होता. त्यानंतर प्रस्तावास मान्यता दिली. प्रस्तावावरील चर्चेत ४ नगरसेवकांनी बाजूने तर दोन सदस्यांनी विरोधात मतदान केले. त्यानंतर विषय मंजूर केला. त्यानंतर शहर सुधारणा समितीच्या ११ सप्टेंबरच्या सभेत हा ठराव रद्द केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button