‘एचआयव्ही’ सह जगणाऱ्या मुलांचा आनंद होणार आता द्विगुणित
![Children living with HIV will now be doubly happy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Manthan-Faundation-Asha-Bhatt.jpg)
मंचर । प्रतिनिधी
मंथन फाउंडेशन, वाय. आर. जी. केअर व रिलीफ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी एचआयव्ही सह जगणाऱ्या ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी दीपक निकम, जिल्हा समन्वयक वाय. आर. जी. केअर यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
मंचर येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ॲक्सेलरेट प्रकल्प अंतर्गत मुलांसाठी आरोग्य, शिक्षण, आहार, सामाजिक सुरक्षितता व सर्वांगीण वक्तीमत्व विकास या पंचसूत्री वर आधारित शून्य ते १८ वयोगटातील मुलांसाठी मंथन फाउंडेशन व रिलीफ फौंडेशन या सामजिक संस्थेच्या सहकार्याने एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने काम सुरू केले आहे. भारतातील हा पहिला उपक्रम पुणे जिल्हा येते राबविण्यात येत आहे. कार्यक्रम दरम्यान विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले यामधे सर्व मुले उत्साहाने सहभागी झाली होती.
आशा भट्ट मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा यांनी सस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच एचआयव्ही संक्रमित व्यक्तींचे हक्क, अधिकार व जबाबदारी याबद्दल माहिती दिली. तसेच मंथन योगाच्या डॉ. नीता पद्मावत यांनी सांगितले की आपल्याला त्रिसूत्री चे पालन करा. त्यामधे ए.आर. टी. वेळेवर खा, दुसरा आहार, तिसरा योगा करा तर आपण अजुन निरोगी, आनंदी व शांतीपूर्ण आयुष्य जगू शकू.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा परदेशी यांनी केले. यावेळी उपस्थित वाय. आर. जी. केअर चे जिल्हा समन्वयक दीपक निकम, मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट, डॉ. नीता पद्मावत , रिलीफ फौंडेशनचे मनीषा परदेशी, कविता परदेशी, रंजना गावडे तसेच तेजस वाकचौरे, रेखा डाळिंबे,अमर चव्हाण, देविदास मोरे आदी.
यावेळी चाकण,मंचर,जुन्नर, नारायणगाव, मावळ अश्या विविध ठिकाणहून एचआयव्ही सह जगणारे एकूण ६० पालक व मुले उपस्थित होती. मुलांना शैक्षिणक साहित्य वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.