breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एका वर्षांनंतरही पिंपरी चिंचवडच्या 72 झोपडपट्टीचे सर्व्हेक्षण रखडले

काम पुर्ण करण्यासाठी संबंधित एजन्सीला ‘झोनिपू’ची नोटीस

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील घोषित व स्वंयघोषित 72 झोपडपट्ट्यांचे तब्बल एका वर्षापासून सर्व्हेक्षण रखडले आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतील सर्वांसाठी घरे उपक्रमाच्या खीळ बसून गोरगरीब लाभार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहिले आहे. याबाबत सर्व्हेक्षण करणा-या संबंधित एजन्सीला झोपडपट्टी पुर्नवसन व निर्मुलन विभागाकडून दोन नोटीस बजाविल्या असून वेळेत काम पुर्ण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत झोपडपट्टी धारकांना घरे देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडून शहरातील 72 घोषित व स्वंयघोषित झोपडपट्टीचे सर्व्हेक्षण करण्यात येणार होते. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वांसाठी घरे (शहरी) अंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागणी केलेल्यांची माहिती संगणकीकृत करण्यात येणार होती. तसेच झोपडपट्टीधारक कुटुंबातील घरांच्या मागणीसाठी महापालिकेने नियुक्‍त केलेल्या एजन्सीकडून सर्व्हेक्षण केले जाणार होते. हे सर्व्हेक्षण तीन महिन्यात पुर्ण करण्यात येणार होते.

या सर्व्हेक्षणानंतर योजनेतील काही घरे “एसआरए’ योजनेतून पुर्ण करण्यात येणार होती. तसेच झोपडपट्टी नागरिकांकडून घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, वीज बिल, बॅंक पासबुक, बिगर निवासी असल्यास “शॉप ऍक्‍ट’ किंवा फूड लायन्सस, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र आदी कागदपत्रे स्विकारली येणार होती.  झोपडपट्टीतील नागरिकांनी सर्व कागदपत्रे तयार ठेवून ती कागदपत्रे संबंधित सर्व्हेक्षणास येणाऱ्यांना देण्यात यावीत, असे आवाहन महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी केले होते.

दरम्यान, शहरी (नागरी) भागासाठी पंतप्रधान आवास योजनेतून च-होली, डुडुळगाव, रावेत, दिघी, मोशी, वडमुखवाडी, चिखली, पिंपरी आणि आकुर्डी  या ठिकाणी घरकुल प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांमध्ये घर घेण्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून घरांचा मागणी सर्व्हेक्षण केले. तसेच शहरातील 72 स्वयंघोषित व घोषित झोपडपट्टी नागरिकांचा स्वतंत्र सर्व्हेक्षण करुन त्यांनाही घरे देण्यात येणार होती. त्यानूसार जून 2017 मध्ये संबंधित एजन्सीला सर्व्हेक्षणाचे काम देवून तीन महिन्याची मुदत दिली होती. परंतू, एक वर्षे उलटूनही संबंधित एजन्सीने झोपडपट्यांचे सर्व्हेक्षण पुर्ण केलेले नाही. त्यामुळे शहरातील झोपडपट्यांचे सर्व्हेक्षण कधी पुर्ण होणार ? असा नागरिकांमधून विचारला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button