breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एकनाथ पवारच शहरवासीयांचे खरे ‘नाथ’ – लक्ष्मण जगताप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – प्रेम आणि सहाय्य करणा-याचा अनाथांना शोध असतो. अशी व्यक्ती त्यांच्यासाठी ‘नाथ’ असते. शहरातील अशा अनेक गरजू व्यक्तींना एकनाथ पवार यांनी सातत्याने सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी एकनाथ पवार त्यांचे ‘नाथ’च आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच भाजपाने त्यांना संधी दिली. त्यांच्यातील नेतृत्व गुणांना हेरून त्यांना महापालिकेत पक्षनेता म्हणून मानाचे आणि तितकेच जबाबदारीचेही पद दिले. हे पद केवळ महापालिकेपुरता मर्यादित नाही. त्यामुळे एकनाथ पवार शहराचेही नेते आणि ‘नाथ’ आहेत, असे मत भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे पक्षनेता एकनाथ पवार यांचा गुरुवारी (दि. 25) चिखलीतील पूर्णानगर येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप बोलत होते. शहर आणि विविध ठिकाणाहून आलेल्या मान्यवरांनीही यावेळी एकनाथ पवार यांच्यावर वाढदिवसानिमित्‍त शुभेच्छांचा वर्षाव केला. चिखलीतील प्रभाग क्रमांक ११ पूर्णानगर येथील शनिमंदिराच्या मैदानावर ‘चला हवा होऊ द्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘झी’ मराठी या वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रीके यांनी या कार्यक्रमात धम्माल विनोद आणि अभिनय सादर करीत हास्यकल्लोळ केला. ”कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत या तिन्ही कलाकारांनी मनोरंजनाचा खजिना उपस्थितांसाठी खुला करून दिला. उपस्थितांनीही हास्याचे फवारे सोडत या कलाकारांना प्रतिसाद दिला.
पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, नितीन काळजे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, युवा शक्ती फाऊंडेशनच्या संचालिका ऐश्वर्या पवार, संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, नगरसेवक शितल शिंदे, शत्रुघ्न काटे, बाबा त्रिभुवन, राजेंद्र गावडे, स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी, नामदेव ढाके, तुषार हिंगे, तुषार कामठे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, गटनेते कैलास बारणे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, केशव घोळवे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, स्वीकृत सदस्य माऊली थोरात, गोपाळ माळेकर, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, अमित गोरखे, प्रसाद शेट्टी, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, कामगार नेते यशवंत भोसले, रामकृष्ण राणे, राजू दुर्गे, भाजपाचे सांगवी मंडलाध्यक्ष अरुण पवार, बाळासाहेब वाघेरे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार जगताप यावेळी म्हणाले की, उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या सर्वांना भाजपाकडून न्याय देण्यात आला आहे. प्रत्येक भागातील व्यक्तींना नेतृत्वाची संधी याच पक्षाने दिली आहे. मराठवाड्याचे नेतृत्व म्हणून एकनाथ पवार यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळेच ते महापालिकेचे सत्ताधारी पक्षनेता आहेत. त्यांना यापुढेही मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे आणखी मोठे पद त्यांच्याकडे चालून येईल.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, कामगार ते महापालिकेचा पक्षनेता असा एकनाथ पवार यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांचा स्वभाव माणसे जोडणारा आहे. कामातील धडाडी त्यांच्यातील नेतृत्वगुण दर्शविते. त्यामुळेच ते यशस्वी झाले आहेत. त्यांची कामाची शैली सकारात्मक असल्याने अधिकाधिक लोक त्यांच्याशी जोडले जात आहेत. मीही त्यांच्या या कार्याने भारावलो आहे.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, शहरवासीयांनी विकासासाठी भाजपाच्या हाती सत्ता दिली. त्या विश्वासाला सार्थ ठरवित भाजपाच्या माध्यमातून आम्ही विकासकामे करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
विक्रमादित्य पवार, सुभाष आहेर, कविता हिंगे, अतुल माने, संदीप मंगवडे, अनिल माने, शिवाजी कणसे, रवि पाटील, बाळासाहेब गंगावणे, गोरख पाटील, राहुल चंदेल, निलेश सुंभे, संतोष ठाकुर, नागेश शेट्टी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. पोपट हजारे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रमादित्य पवार यांनी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button