उरण परिसरातील विविध गावात पार्थ पवार यांचा घर टू घर प्रचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190425-WA0005.jpg)
- पदयात्रांना ग्रामस्थांचा उर्स्फुत प्रतिसाद
- मावळचे प्रश्न मार्गीचे लावण्याचे दिले आश्वासन
उरण ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे काॅंग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी उरण परिसरातील विविध गावांना आज (बुधवार) भेटी दिल्या. यावेळी दिघोडे, दादरपाडा, विधणे आणि टाकीगाव गावांच्या लोकांनी पार्थ पवारांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सोयी-सुविधा यासह विविध समस्या मांडल्या. त्यावर तुम्ही मला लोकसभेला साथ द्या, तुमचे सगळे प्रश्न निश्चित सोडवेन, असे आश्वासन पार्थ पवार यांनी दिले.
मावळ लोकसभेचे मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा उरण परिसरात प्रचार जोरदार सुरु आहे. यामध्ये दिघोडे येथील गावापासून प्रचाराला सुरुवात झाली. पार्थ पवार यांचे गावक-यांनी उत्साहात स्वागत केले. दिघोडे गावक-यांनी आयोजित केलेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्यासमोर विविध प्रश्न मांडण्यात आले. पायाभूत सोयी-सुविधाकडे शिवसेना खासदारांनी लक्ष न दिल्याने विकास खुंटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर पार्थ पवार यांनी सर्व समस्या जाणून घेतल्या. तुम्ही मला साथ द्या, तुमच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम मी प्रामाणिकपणे करेन, असेही त्यांनी आश्वासन दिले.
तसेच दादरपाडा गावात पार्थ पवार यांची पदयात्रा काढण्यात आली. गावातील लोकांनी त्यांचे उत्साहात स्वागत करुन घरोघरी जावून प्रचार यात्रा काढण्यात आली. तसेच विधणे गावात प्रभातफेरी काढली. तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पार्थ पवार यांनी अभिवादन केले. टाकीगाव येथील ग्रामस्थांनी देखील पार्थ पवारांचे स्वागत केले. त्यांचे प्रश्न देखील पार्थ पवार यांनी जाणून घेतल्या. त्यावर निवडणुकीनंतर आपण सर्वांनी मिळून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु या, असे पवार यांनी सांगितले.