breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमहापौर केशव घोळवे…ही कसली निष्ठा?; निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचा सवाल!

  • केंद्र सरकारविरोधी कामगार संपात मोरवाडी चौकात भाषणबाजी
  • निष्ठावंत म्हणून मिळवलेले उपमहापौरपद महिन्याभरात विसरले

पिंपरी | विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी महिनाभरापूर्वी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत असे “मार्केटिंग” करत उपमहापौरपद मिळवले. मात्र, अवघ्या महिनाभरात घोळवे ‘निष्ठा’ विसरले का? असा सवाल भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.

भाजपाप्रणीत केंद्र सरकार विरोधात गुरुवारी देशभरातील शासकीय, निमशासकीय, अशासकीय कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला. उद्योगनगरी आणि कामगारनगरी असा लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील हजारो कामगार यानिमित्ताने रस्त्यावर उतरले.

दरम्यान, मोरवाडी चौक येथे शेकडो कामगार गुरुवारी सकाळी जमा झाले होते. कामगार क्षेत्रात कार्यरत असलेले केशव घोळवेसुद्धा संप आणि निदर्शनात सहभागी झाले होते. कामगारांच्या हक्कांसाठी लढणे ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. पण, मोदी सरकारला आव्हान देणाऱ्या या संपात भाजपाचे उपमहापौर सहभागी होतात, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वतः लक्ष घालून भाजपाचा निष्ठावंत चेहरा असल्याने केशव घोळवे यांना उपमहापौरपदी संधी द्यावी, असा आदेश भाजपाचे अनेक निर्णय आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांना दिले होते. त्यामुळे महिनाभरापूर्वी घोळवे यांना महापौरपदाची संधी मिळाली. निष्ठावंत चेहऱ्याला न्याय मिळाला, असे या निर्णयाचे स्वागतही झाले. पण, घोळवे पक्षनिष्ठा विसरले.

दरम्यान, घोळवे यांनी केंद्र सरकारने ऐतिहासिक कामगार बिल आणले. त्यामुळे कामगारांचा कसा फायदा होईल? याबाबत कामगारांमध्ये जनजागृती केली असती, तर पक्षविरोधी आंदोलनात सहभागी होण्याची वेळ आली नसती, असा सूर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button