breaking-newsपिंपरी / चिंचवड

उन्नतीच्या वतीने सामाजिक योगदान देणा-या मान्यवरांचा कोरोनायोध्दा पुरस्काराने सन्मान

पिंपरी / महाईन्यूज

कोरोना महामारीच्या काळात समाजातील अनेक घटकांना विविध प्रकारे मदत करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा करोनायोद्धा पुरस्कार देऊन पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे व अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व करोना काळात गरजूंना रोज जेवणाचे टिफिन पुरविणारे रवि मुंढे, भारत लोहीया, मोहित अग्रवाल, उषा अग्रवाल, दिक्षा केजरीवाल, पाटील, विजया काटे, पंकज देशमुख, संतोष कवडे, प्रसाद पाखरे, ललित केरीवाल व अभिजित धारूनकार यांना कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कोरोना महामारी सुरु झाली आणि होत्याचे नव्हते झाले. अनेक कामगार अन्नावाचून भुके राहू लागले. जेंव्हा रोज आयकाॅन सोसायटीमधील महिलांना समजले तेंव्हा सोसायटीतील २०० महिलांनी ३ महिन्यात २२ हजार जेवनाचे टिफीन पुरवले. रहाटणी, पिंपळे सौदागर भागातील जेवढे गरजवंत होते, त्यांच्यापर्यंत जेवणाचे डबे पोहचविण्यात आले.

याप्रसंगी उन्नती सोशल  फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या, जे नागरिक स्वतःच्या जीवाची परवा न करता व कुटुंबाची जवाबदारी सांभाळून दुसऱ्यासाठी मदत करतात. अहोरात्र झटतात त्यांना सन्मानित करून प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने आम्ही अशा नागरिकांचा सन्मान करणे उच्चीत समजले आहे.

त्यावेळी रोज आयकॅान सोसायटीचे चेअरमन रवी मुंढे व सोसायटीतील सर्व सभासदांतर्फे उन्नती फाउंडेशन व कुंदा संजय भिसे यांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button