breaking-newsपिंपरी / चिंचवड

उद्या चिंचवडमध्ये रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांचेकडून पवना नदीची महाआरती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सांडपाणी मुक्त व जलपर्णी विरहित स्वच्छ सुंदर पवनामाई अभियानाच्या तिसऱ्या पर्वाची सुरवात उद्या शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी 6 वाजता जिजाऊ पर्यटन केंद्र, मोरया गोसावी मंदिराशेजारी, चिंचवड येथे होणार आहे. आपली संपूर्ण शहराची जीवनदायिनी पवनामाईची महाआरती करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला गेली २ वर्षे अविरतपणे पिंपरी-चिंचवडमधील नदीच्या प्रदूषण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या १०० सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी, इतर सामाजिक संस्था, पाठीमागील २ वर्षात रोटरीला नदी स्वच्छतेसाठी सीएसआर फंडातून भरगोस निधी देणारे मेसर्स एक्साइड बॅटरीज उद्योग समूह, मेसर्स सद्गुरू इंटरप्रायजेस हिंजवडी, चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, इतर नदी प्रेमी या सन्माननीय यांच्या उपस्थितीमध्ये जीवनदायिनी पवनामाईची महाआरती करण्यात येणार आहे.

आपल्या पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जीवनदायिनी पवना नदी बद्दल नागरिकांमध्ये आत्मीयता वाढावी, प्रेम वाढावे आणि त्याचबरोबर आपल्या कृतीतून नदीमध्ये कचरा अथवा कोणत्याही प्रकारचे प्लास्टीक, सांडपाणी टाकू नये अथवा सोडू नये, यासाठी इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला वेगवेगळ्या घाटावर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व इतर संस्थांच्या माध्यमातून महा आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती क्लबचे प्रेसिडेंट ऍड. सोमनाथ हरपुडे यांनी दिली. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button