‘उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार, भाजप पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG-20200522-WA0006.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन – आंगन हेच रणांगण’ या आंदोलनाद्वारे आज शुक्रवार (दि.२२) पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शिवनगरी, बिजलीनगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह “उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार”, “महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात; उद्धव सरकार मात्र आपल्या घरात ” असे निषेध फलक तयार करून घोषणा देत राज्य सरकारचा निषेध नोंदवला.
यावेळी, कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टंस राखून आंदोलनात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी, शंकर पाटील, अशोक बोडखे, राकेश चौधरी आदी होते.
मुंबई, पुणे, ठाणे, संभाजीनगर, मालेगाव, येथे तर सबकूच राम भरोसे असेच आहे. केंद्र सरकारने खूप कठोर उपाययोजना करत एक अभूतपुर्व असे जंम्बो पॅकेज घोषित केले. प्रत्येक राज्याला त्याच्या वाटयाची आर्थिक मदत व अन्य मदती केंद्रशासन करत आहे. अनेक राज्यांनी केंद्राच्या घोषनेआधी किंवा नंतर स्व्त:च्या राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध पॅकेजेस घोषित केले आहेत.
अद्याप पावेतो राज्यसरकारने केंद्राकडे बोट दाखविण्याशिवाय कुठलेही पॅकेज घोषित केले नाही कि, कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचललेली नसल्याचेही ढाके यांनी यावेळी म्हटले आहे.