breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आरटीई प्रवेश नोंदणीसाठी शाळांना दोन दिवसांची मुदतवाढ

पिंपरी |महाईन्यूज|

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी शाळांनी नोंदणी करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ केली आहे, त्यामुळे सोमवारपर्यंत (दि १०) नोंदणी करता येणार आहे.

पुणे शहर व जिल्ह्यातून शनिवारी रात्रीपर्यंत आठ हजार ५४९ शाळांनी नोंदणी केली असून, त्यात एक लाख सहा हजार ६०१ विद्यार्थी क्षमता निर्माण झाली आहे, तर पुणे शहर व जिल्ह्यातील ८९६ शाळांची नोंदणी झाली असून, १५ हजार ६९१ विद्यार्थांचा प्रवेश होऊ शकतो. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी शाळांना नोंदणी करण्याची मुदत होती. परंतु, शासनाकडून पैसे मिळत नसल्याने अनेक शाळांनी यात भाग न घेण्याचा पवित्रा घेतला होता. नोंदणी कमी झाल्याने दोन दिवसांची मुदतवाढ देऊन ८ फेब्रुवारीला ही मुदत संपणार होती. तरीही सुमारे एक हजार शाळांनी ऑनलाइन नोंदणी केलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button