breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्त तुकाराम मुंडे तुम्हाला नको असतील तर आम्हाला द्या – दत्ता साने

  • आयुक्त श्रावण हार्डीकर निशान्यावर
  • सत्ताधारी भाजपलाही दिला आहेर

 

पिंपरी – आपल्या आक्रमक शैलीने प्रचलित असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सत्ताधारी भाजपला चांगलाच आहेर दिला आहे. भाजपने अविश्वास ठराव मांडून नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोंडीत पकडले असतानाच साने यांनी तुकाराम मुंडे तुम्हाला नको असतील, तर आम्हाला द्या, अशा शब्दांत त्यांनी पिंपरी पालिकेतील आयुक्त श्रावण हार्डीकर यांना टार्गेट करत सत्ताधारी भाजपला सुनावले आहे. या वक्तव्याने साने चांगलेच चर्चेत आले आहेत.

 

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत हर्डीकर व साने यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. राग अनावर झाल्याने त्यानी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला. साने यांनी हर्डीकर यांच्यावर सडकून टीकाही केली होती. दरम्यान, मुंडे प्रकरण समोर आले. नाशिक पालिकेत सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दिला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे तो मागे घेण्यात आला. हा धागा पकडून त्यांना मुंडे नको असतील, तर आम्हाला द्या, अशी मागणी साने यांनी केली आहे. हर्डीकर यांनी त्यांना अज्ञानी संबोधल्याचा वचपा काढून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. मुंडेंना पिंपरीत आणण्याची मागणी करून त्यांनी वादग्रस्त हर्डीकर यांच्या बदलीचीच अप्रत्यक्ष मागणी केली आहे. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मागणी करू, असे त्यांनी सांगितले.

 

पंतप्रधान आवास योजनेचा चुकीचा डीपीआर बनवून पालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान पोचविणारे सह शहर अभियंता राजन पाटील व कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांना निलंबित करून त्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याजोडीने पालिका गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवून आयुक्तांनी निवेदन दिले जात आहे. त्यामुळेच वैतागलेल्या आयुक्तांनी साने यांचा भर बैठकीत परवा अपमान केल्याचे समजते. त्याचा वचपा अशा पध्दतीने साने यांनी काढला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button