breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तासाहेब…धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करु नका; अन्यथा कर्मचा-यांचा उद्रेक होईल

पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचा निवेदनाद्वारे आयुक्तांना इशारा

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांना लागू केलेली धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्यात येवू नये. अन्यथा पालिका कर्मचा-यांचा उद्रेक होवून आंदोलन करावे लागेल, असा इशारा कर्मचारी महासंघाने दिला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले की, महापालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना आरोग्य सोयी-सुविधांसाठी धन्वंतरी स्वास्थ योजना सुरु आहे. सदरची योजना बंद करुन सर्वांना विमा पाॅलिसी लागू करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरु आहेत.

आपणांस स्मरणपत्राद्वारे सूचित करण्यात येते की, विमा योजना लागू करण्यापुर्वी कर्मचा-याना योजनेची संपुर्ण माहिती देणेत येईल, तसे यापुर्वी आपण मान्य केले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने न्यू इंडिया इन्शूरन्स या खाजगी विमा कंपनीकडून कर्मचा-याना विमा योजना राबविणेत आली होती. सदरील योजना दोन वर्षातच बंद पडली. त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचा-याना विश्वासात न घेता विमा योजना लागू कर्मचा-याचा उद्रेक होईल. तसेच धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करु नये. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा सुचक इशारा महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, महासचिव सुप्रिया सुरगुडे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button