breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांचे काम वाखाणण्याजोगे, महापौरांकडून हर्डीकरांचे तोंडभरून कौतुक

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाच्या प्रतिकुल परिस्थितीत वातावरण सावरण्याकरीता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे असून या शहराच्या ते स्मरणात राहील असे गौरवोद्गार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी काढले.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांची सचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आज महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, नगररचना उपसंचालक रा. म. पवार, मुख्यलेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी के अनिल रॉय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, उप आयुक्त मंगेश चितळे, अजय चारठणकर, मनोज लोणकर, नगरसचिव उल्हास जगताप, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व क्षेत्रिय अधिकारी आदी उपस्थित होते.

कोरोना काळात आयुक्त हर्डीकर यांनी वेळीच दक्षता घेऊन नियोजन केले. हे काम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वपूर्ण ठरले आहे. नागरिक आणि पोलीस दलाने देखील या काळात चांगले सहकार्य महापालिकेला केले. लोकांसाठी काम करण्याची संधी पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळे शहर विकासात लक्षात राहील असे प्रत्येकाने काम करावे.  करदात्यांच्या पैशाचा विनियोग योग्य पध्दतीने करण्याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. पाण्याचे व्यवस्थापन करून नागरिकांना मुबलक शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची सुचना देखील महापौर ढोरे यांनी केली. कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी प्रत्येक विभागाने घ्यावी असा आदेश देखील महापौरांनी दिला.

 या नंतर विभाग प्रमुखांची बैठक आयुक्त हर्डीकर यांनी घेतली. आर्थिक वर्ष संपत येत असल्याने कर वसुलीचे काम वेळेत करण्याच्या सुचना आयुक्त हर्डीकर यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना तसेच क्षेत्रीय अधिका-यांना दिल्या. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी नियोजन करावे तसेच पाणी पुरवठा नियोजनबध्द करण्यासाठी व्यवस्थापन करण्याच्या सुचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button