breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत !” राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘ट्रेण्ड’

  • शपथ विधीनंतर अजित पवारांच्या विरोधात वातवरण ढवळले
  • पिंपरी-चिंचवडमध्ये देखील साहेबांच्या विचाराला सलाम

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा एकप्रकारे पक्षाचा विश्वासघात असल्याचे राजकीय क्षेत्रात मानले जात आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार असे दोन पर्याय राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाले आहेत. बहुतांश कार्यकर्ते आम्ही पवार साहेबांसोबत आहोत, अशा प्रतिक्रिया देत आहेत. बारामतीत देखील “आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत !” असा मजकूर असलेला सार्वजनिक फ्लेक्स लावून संपूर्ण बारामतीकरांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्यास पसंती दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीच्या काही मोजक्या आमदारांना सोबत घेऊन अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राजभवनात जाऊन आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि त्यांच्या या भूमिकेबाबत उपस्थित आमदारांना तिळमात्र खबर नसल्याचे सांगितले जात आहे. जे उपस्थित होते ते आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे आले. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत किती आमदार जाणार आहेत, हे अद्यापही सांगणे कठीण आहे. मात्र, अजित पवार यांच्या भूमिकेने राज्यातील राजकीय सत्ता समिकरणे बदलली आहेत. शरद पवार यांची मोठी गोची झाल्याने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

अजित पवार कोणालाही न सांगता स्वतः भाजपसोबत गेले असल्याने राष्ट्रवादीचा तळागाळातील कार्यकर्ता सुध्दा त्यांच्या विरोधात जाताना दिसत आहे. सोशल मीडियावर आजित पवार यांच्याबाबत ट्रोल होताना पहायला मिळत आहे. अशातच आता कोणासोबत जायचे असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. त्यातच बारामतीत आम्ही 80 वर्षाच्या योध्यासोबत ! अशा आशयाचा फ्लेक्स समस्त बारामतीकरांच्या वतीने लावण्यात आला आहे. यावरून अजित पवार यांच्या मतदार संघातच त्यांच्याविषयी नाराजी पहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button