breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार लक्ष्मण जगतापांचा ‘आरोग्य संजीवनी उपक्रम’; मोठ्या आणि खर्चिक आजारांवर मोफत उपचार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या आजारांवर निदान करणारी अनेक रुग्णालये आहेत. मात्र गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना अशा आजारांवरील उपचारांचा खर्च परवडत नाही. खर्चिक सेवेमुळे आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडण्याच्या भितीने नागरिक मोठ्या आजारांवर उपचार करणे टाळतात. परंतु, आता शहरातील कोणत्याही नागरिकाला पैसे नाहीत म्हणून मोठ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रियेपासून वंचित राहावे लागणार नाही. कारण भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील नागरिकांना खर्चिक आणि मोठ्या आजारांवर पूर्णतः मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी “आरोग्य संजीवनी” हा उपक्रम हाती घेतला आहे. पैशांअभावी मोठ्या आजारांवर उपचार करणे शक्य नसणाऱ्या रुग्णांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी संपर्क साधावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालये किंवा खासगी रुग्णालयांमार्फत शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. यांतील अनेक ठिकाणी रुग्णांच्या चाचण्या माफक दरात करण्याची सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, चाचणीनंतर मोठ्या आजारांवरील उपचार सेवा अत्यंत खर्चिक असते. खार्चिक सेवा असल्यामुळे गरीब तर सोडाच परंतु मध्यमर्गीय कुटुंबही या आजाराशी लढताना आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडतात. अशावेळी अनेक रुग्ण पैशांअभावी मोठ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करणे टाळतात, किंवा शासकीय मदत मिळावी म्हणून सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवतात. त्यात यश आले तरच पुढील उपचार गोरगरीब रुग्णांच्या नशीबी येते. त्यामुळे शहरातील एकही गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्ण पैशांअभावी मोठ्या आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी “आरोग्य संजीवनी” हा उपक्रम हाती घेतला आहे.

उपचाराचे थोडक्यात स्वरुप

या उपक्रमांतर्गत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून किडनी ट्रान्सप्लांट, कॅन्सर (कर्करोग), हृदयाची शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया, खुब्यावरील शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी मदत केली जाणार आहे. आजमितीला किडनी ट्रान्सप्लांटसाठी  १० ते १२ लाख रुपये खर्च येतो. परंतु, ज्या रुग्णांच्या घरामध्ये रक्ताच्या नात्याचे किडनी डोनर आहेत. पण फक्त आर्थिक परीस्थितीमुळे शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही, अशा रुग्णांना पूर्णतः मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. लहान बालकांच्या ह्दयामधील छिद्राची शस्त्रक्रिया करण्यासाठी ५ ते ८ लाख रुपये खर्च येतो. परंतु, हा खर्च गोरगरिबांना परवडणारा नसल्याने हा आजार झालेल्या बालकांचे आई वडील मानसिक, शारीरिक व आर्थिदृष्ट्या अत्यंत त्रस्त होतात.

अशा नागरिकांना आपल्या मुलाच्या ह्दयाला असणाऱ्या छिद्रावर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यासाठी पिंपळेगुरव, शिवाजी चौक येथील जगताप पाटील कॉम्प्लेक्समधील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधून नाव नोंदणी करावे. तसेच अधिक माहितीसाठी संबंधितांनी 8208487723 किंवा 02027285200 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button