breaking-newsपिंपरी / चिंचवड
आमदार जगतापांनी केले तुकोबारायांच्या पालखीचे सारथ्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/36762816_641000109591091_8296061629548724224_n.jpg)
पिंपरी – संतश्रेष्ठ तुकाराम महाराजाच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान झाले. त्या पालखीचे कासारवाडी येथे आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वागत केले. त्यानंतर पालखी रथाचे त्यांनी सारथ्य केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला होता.
आमदार लक्ष्मण जगताप हे वारकरी कुटुंबातील आहेत. त्यांची ही परंपरा आणि कुटुंबाचा भक्ती संप्रदायाचा वारसा आमदार जगताप पुढे चालवित आहेत. शहरात मुक्कामी आलेल्या तुकोबारायांच्या पालखीरथाचे त्यांनी सारथ्य केले. खासदार अमर साबळे हे सुद्धा त्यांच्याबरोबर उपस्थित होते. यावेळी आमदार जगताप यांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीची आरती करण्यात आली. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती.