breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार जगतापांच्या वाढदिवसानिमित्त थेरगावात भव्य नोकरी मेळावा

  • तरुणांना मिळणार बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी
  • पन्नासहून अधिक कंपन्या होणार सहभागी

पिंपरी / महाईन्यूज

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अभिषेक बारणे आणि नगरसेविका अर्चना बारणे यांच्या वतीने थेरगाव येथे भव्य नोकरी मेळावा भरविण्यात येणार आहे. त्यासाठीची नोंदणी सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोरगरिब, होतकरू तरुणांच्या हाताला काम मिळावे, या उदात्त हेतुने हा नोकरी मेळावा 21 फेब्रुवारी रोजी भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये 50 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होत आहेत. मेळाव्याच्या माध्यमातून शहरातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय याठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी पाचपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे. तरुणांनी बायोडेटा व कादपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह उपस्थित रहावे, असे आवाहन नगरसेवक अभिषेक बारणे यांनी केले आहे.

नोकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी 15 फेब्रुवारीपासूनच नोंदणीला सुरूवात झाली आहे. इच्छुक तरुणांनी वेळेत नोंदणी करावयाची आहे. नोंदणी अर्ज घेण्यासाठी नगरसेवक अभिषेक बारणे यांचे थेरगाव येथील वनदेवनगर, कोकनट कॉर्नर येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा. तसेच, नगरसेविका अर्चना बारणे यांच्या संदीपनगर, शिवराज कॉलनी येथील जनसंपर्क कार्यालयात देखील अर्ज उपलब्ध आहेत. याठिकाणी संपर्क साधून नोंदणी अर्ज मिळवावा, असे आवाहन बारणे यांनी केले आहे. तसेच, ऑनलाईन नोंदणीसाठी www.thergaon.jobfair.ind.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन युवा नेते तानाजी बारणे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button