आनंदनगरमध्ये साधु वासवानी मिशनतफें कुटूंबियांना अन्नधान्य कीटचे वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/1-15.jpg)
– पंधरा दिवस पुरेल एवढा किराणा दोन दिवस सव॔ कुटूबियांना वाटणार
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पुण्यातील साधु वासवानी मिशनतफें चिंचवडच्या आनंदनगर झोपडपट्टी परिसरात साडेसातशे कुटूबियांना अन्नधान्य कीटचे आज (शुक्रवार) वाटप करण्यात आले. तसेच उद्याही उव॔रीत लोकांना किराणा साहित्याचे एकञित किट देण्यात येणार आहे.
लाॅकडाऊनमुळे चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना विविध अडीअडचणीचा सामना करावा लागला. रोजगार नसल्याने काहींना उपासमारीची वेळ आली. यामुळे नागरिकांनी आंदोलन केले. त्यांना महापालिकेने सोयीसुविधा देण्याचे आश्वासन दिले.
पुण्यातील साधु वासवानी मशिनच्या वतीने चिंचवड आनंदनगर येथील रहिवाशांना किराना सामानाचे किट उपलब्ध करुन दिले. अन्नधान्य प्रत्येक कुटुंबाला मोफत देण्यात येत आहे. आज शुक्रवार (दि 19) पासून हे जीवनावश्यक किटचे वाटप सुरु केले. नागरिकांना टोकन देवुन साडेसातशे कुटूबियांना अन्नधान्य कीट दिले. उद्याही सव॔ नागरिकांना हे किट देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी पुढाकार घेतला. यावेळी अ प्रभागाचे अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान. या उपक्रमाबद्दल नगरसेवक शितल शिंदे यांनी साधु वासवानी मिशन आणि पिंपरी महापालिकेकडे पाठपुरवठा करुन आनंदनगर वासियांना अन्नधान्य किट देण्यात आले आहेत. तसेच या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात बंधू भगिनींचे आनंदनगरमधील नागरिकांच्या वतीने नगरसेवक शितल शिंदे यांनी आभार मानले.