आधी नेत्यांचे फोटो पायदळी तुडवायचे, आता निष्ठा दाखविण्यासाठी पवारांचा पुळका आलाय?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/download-1-copy-1.jpg)
– संजोग वाघेरे-पाटील यांचा निष्ठा दाखविण्यासाठी आटापिटा, पक्षनेते एकनाथ पवारांचा आरोप
पिंपरी ( महा ई न्यूज ) – एकेकाळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिली नाही, त्यांचे तिकीट कापले, म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वेा शरद पवार व अजित पवारांचे फोटो पायदळी तुडविले होते, हा इतिहास सर्वांना माहिती आहे. आता त्यांनी निष्ठा दाखविण्यासाठी राष्ट्रवादींच्या पवारांचा एवढा पुळका कशाचा आला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना स्वताःची राजकारणातील उंची पाहून टीका करावी, असा सल्लाही सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला.
सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार जेलमध्ये जातील, असे भाकित पुन्हा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सावधगिरीच्या भूमिकेत गुरूवारी (दि. 17) शहरात आल्य़ानंतर वर्तविले. मात्र, त्यावरून राष्ट्रवादीकडून वाघेरे यांनी प्रत्युत्तर देताना उंची पाहून बोलण्याचा सल्ला दानवे यांना दिला होता. त्यावर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, संजोग वाघेरे-पाटील यांनी एकेकाळी उमेदवारीसाठी तिकिट दिले नाही. म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांचे फोटो तुडविले होते. त्यांना आता राष्ट्रवादीच्या पवारांचा एवढा पुळका आला आहे. मात्र, तो त्यांचा पक्षाचा भाग असला, तरी वाघेरे यांनी आपली राजकीय उंची पाहून बोलले पाहिजे.
तसेच रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत 23 निवडणुका लढवून जिंकल्या आहेत. आमदार, खासदार ते केंद्रीय मंत्री राहिलेल्या दानवे यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांबाबत त्यांनी बोलू नये. गेल्या महापालिका निवडणुकीत वाघेरेंनी त्यांची झालेली हालत पाहावी. त्यावरून त्यांना आपली राजकीय उंची कळेल, अशी टिकाही पवार यांनी केली.