आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोराचं ‘प्राॅडक्ट’, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/images_1524999130703_Jayant_Patil.jpg)
- सल्लागार लावून शिवसेनेला राजकारण करण्याची वेळ
पुणे – आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांच प्रॉडक्ट असून शिवसेनेवर कन्सलटंसी लावून राजकारण करायची वेळ आली आहे, अशी खोचक टीका करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेवरून समाचार घेत शिवसेनेचा मोर्चा हा फेससेव्हिंग असल्याचे त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थान आज(रविवारी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात महाराष्ट्रातल्या 288 जागांच्या 780 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यावर तपशीलवार चर्चा करण्यात आली. मागवलेल्या अर्जांवर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
यावेळी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले, आमचे आमदार मुख्यमंत्र्यांना कामासाठी भेटायला जातात. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजप विसरले आहे. विरोधक मजबूत नसतील तर मग त्यांचे आमदार का पळवले जात आहेत, असा सवाल यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. शिवसेना-भाजप युतीत मुख्यमंत्रिपदावरून कलगातुरा सुरू आहे. शिवसेनेला भाजपच नेतृत्त्व मान्य नाही, हे सांगत भाजप सेनेचे नेते आमच्याही संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.